शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु: तालुक्यातील श्री क्षेत्र टाकळी येथील श्री लक्ष्मी माता मंदिर येथे चैत्र पंचमी निमित्त यात्रा महोत्सव साजरा होत असुन शुक्रवार दि.३एप्रिल ला सकाळी दिपप्रज्वलन करून कलश स्थापना तसेच घटस्थापना करण्यात आली यावेळी शुभाताई घाडगे, भगवंत गोहणे, गजानन कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दि.४ एप्रील पहाटे पाच वाजता पासुन सामुदायिक प्रार्थना, आरती, भजन संध्या तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दि.७ एप्रिल मंगळवारी पहाटे पाच वाजता सामुदायिक प्रार्थना,काकड आरती, महापुजा तसेच घटविसर्जन करण्यात येणार असुन रात्री आठ सप्त खंजेरी वादक जान्हवी घुमे नागपुर यांचे किर्तन त्याचप्रमाणे दि.८ एप्रील बुधवारला दुपारी एक ते चार ह.भ.प. चेक महाराज गुरुजी यांचे काल्याचे किर्तन, पाच वाजता दहिहंडी होणार आहे.या निमित्त विविध प्रकारच्या खेळण्याची दुकाने, पुजा साहित्याचे दुकाने तसेच लहान मुलांसाठी लागलेली झुले यामुळे यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 


