राजेश वरटकर
मुख्य संपादक 
विदर्भातील “प्रती पंढरपुर” म्हणुन ओळख असलेल्या श्री संत केजाजी महाराज मंदिराचा कारभार सध्या भक्तीपेक्षा भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकला असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
ईमानदार लिपिकाची हकालपट्टी -ढोंगींना मोकळे रान!
मंदिराचे सचिव डॉ. सुरेश धंदरे यांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लिपिकाला बाहेरचा रस्ता दाखवत संशयास्पद वर्तन असलेल्या व्यक्तीच्या हातात मंदिराच्या कपाटाची चावी दिल्याने संताप व्यक्त होत आहे.
गावठी दारू, बोकड आणि “जय हरी”चा दिखावा!
रामप्रहरी दारूच्या दुकानात हजेरी लावणारा,मोहाची दारू पिऊन मंदिरात वावरणारा तसेच कोंबडे- “बोकडे”खाणारा कथीत ढोंगी “महाराज” आता मंदिराचा कारभार पाहत असल्याचा आरोप होत आहे. ही बाब मंदिराच्या पवित्रतेला काळिमा फासणारी ठरत आहे.
भ्रष्टाचारात पुढाकार घेऊन स्वतः ला समाज सेवक समजणा-या स्वयंभु नेत्याची दादागिरी
सात सदस्यांच्या ट्रस्टमध्ये श्री संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव निमित्त तात्पुरत्या नियुक्त सदस्यांची दादागिरी सुरू असुन मंदिराचा कारभार काही मोजक्या लोकांच्या इशाऱ्यावर चालत असल्याची चर्चा रंगली आहे.
लिपिक भरतीतही खेळ -लिपीकाचा वशिला लावणारा “विश्वगुरू” कोण?
नवीन लिपिक भरतीसाठी सुरू असलेली हालचाल संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. “हा विश्वगुरू नेमका कोण?” असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.
भाविक गप्प – भ्रष्ट मंडळी मस्त!
‘मंदिर कमेटी हटाव, संत नगरी बचाव’ म्हणणारे युवा नेते व
भाविकांनी चुप्पी साधल्याने मंदिर समितीचा अनागोंदी कारभार दिवसेंदिवस बळावत चालला आहे. श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला हा खेळ आता उघडपणे सुरू असल्याची टीका होत आहे.
युवा नेतेही मागे -कोणाच्या दबावाखाली?
मंदिर समिती बरखास्त करण्याची भाषा करणारे गाव नेते अचानक गप्प झाल्याने मंदिर कमेटी ने कोणतं चाकलेट दिलं तर नाही ना? असा संतप्त सवाल उपस्थित झाला असुन श्री संत केजाजी महाराजांची पुण्यतिथी साजरी करताना पुढे-पुढे करणारे अचानक शांत झाल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.
दररोज सकाळ -संध्याकाळी भक्तीचा जागर होणा-या मंदिर कमेटी च्याअनागोंदी कारभारामुळे मंदीराची प्रतिमा मलीन होत असतांनाही गावकरी, माळकरी व वारकरी उघड्या डोळ्यांनी तमाशा बघत असल्याने भाविकांनीच मुक संमती दिली की काय?असा संतप्त सवाल पंचक्रोशीतील हजारो भाविक करीत आहे.
(क्रमशः)
पुढील अंकात वाचायला विसरू नका!
“भक्तीच्या नावाखाली लुट – केजाजी मंदिरातील भ्रष्टाचारी सचिवाला कोणाचा आशीर्वाद?”

