विशेष प्रतिनिधी
यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील बहिरम देव शिव महापुराण समितीचे वतीने आयोजित श्री शिव महापुराण कथेला शिवभक्तांचा अभुतपुर्व प्रतिसाद लाभला. कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी आपल्या ओजस्वी वाणीने उपस्थितांना संबोधित करत शिवभक्तीचा संदेश दिला.
सकाळी जोरदार पाऊस पडुनही भक्तांच्या उत्साहात कुठेही कमी दिसून आली नाही. विविध भागांतून शिवभक्तांचे जत्थे कथा स्थळी दाखल झाले. वर्धा आगारातुन तसेच यवतमाळ आगारातुन विशेष बसची सोय करण्यात आल्यामुळे भक्तांना मोठा दिलासा मिळाला.
कथेचा शेवटचा दिवस असल्याने महाराष्ट्रासह राज्याबाहेरील शिवभक्तांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. विशेष म्हणजे महिला भक्तांचीही लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली.
बहिरम देव शिव महापुराण 

समितीच्या वतीने ३० मार्चपासुन सुरू झालेली ही सात दिवसीय कथा उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. संपुर्ण परिसर “हर हर महादेव”च्या जयघोषाने दुमदुमून गेला.

