*वर्धेतील दुहेरी हत्याकांड
*महिला आश्रम परिसरातील
धक्कादायक वास्तव
मंगेश शेंडे
विशेष प्रतिनिधी
वर्धा: येथील महिला आश्रम परिसरात हे दुहेरी हत्याकांड शनिवारी रात्री घडले. त्यात प्रभाकर भलमे व त्यांचा मुलगा नितीन भलमे यांचा मृत्यु झाला आहे. आरोपी हा अल्पवयीन पुतण्याच आहे. त्यास वर्धा पोलिसांनी अटक केली. याच कुटुंबातील एकाचे शनिवारी रात्री लग्न होते. त्यासाठी नवरदेव व अन्य वऱ्हाडी मंडळी मारोती मंदिरात पोहचली. महिला आश्रम समोरील मारोती मंदिरात सर्व दर्शन घेऊन परत जात होते त्याचवेळी ही घटना घडली. आरोपी अल्पवयीन मुलाने त्याचे काका व चुलत भाऊ असलेल्या युवकावर चाकुने वार करणे सुरू केले. सपासप वार करण्यात आल्याने रक्ताचा सडाच पडला त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नातलगांनी आरोपी अल्पवयीन मुलाला अडवण्याचा प्रयत्न केला परंतु हातात हत्यार असल्याने कोणी पुढे आले नाही.आरोपी मुलाच्या डोक्यात बदल्याची भावणा शांत बसु देत नव्हती असे उपस्थित लोकांच्या चर्चेतुन समोर आले.आरोपी अल्पवयीन मुलगा तसेच दोन्ही मृतक हे बरबडी येथील एकाच परिवारातील असुन शेती करतात.त्यांचा संपत्ती वरुन जुना वाद होता.आठ महिण्यापुर्वी आरोपी व त्याचा काका मृतक प्रभाकर भलमे यांच्या सोबत संपत्ती वरुन वाद झाला होता तेव्हा पासुनच आरोपी हा सुडाने पेटुन बदला घेण्यासाठी संधी शोधत असल्याचे समजते.शनिवारी रात्री मृतकाचे परिवारातील लग्न महिला आश्रम परिसरात होते. त्यामुळे काका लग्नाला येणार हे माहीत असल्याने आरोपीने दोन दिवसा आधी धारदार चाकु आँनलाईन बोलावला असल्याची माहिती पुढे आली आहे, नवरदेव मंदिरातुन दर्शन घेउन येत असतानाच आरोपीने काका व चुलत भावावर धारदार चाकुने सपासप वार केले, यावेळी व-हाडी मंडळी नाच गाण्यात मग्न होते पण जेव्हा लक्षात आले तेव्हा सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता, उपस्थित नातलगांनी गंभीर जखमी दोघांनाही त्याच अवस्थेत सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार पण सुरू झाले. मात्र उपचारा दरम्यान प्रभाकर भलमे व नितीन भलमे यांची प्राणज्योत मावळली.
संपत्तीचा वाद दुहेरी हत्याकांडात होईल याची पुसटशी कल्पनाही नातलगांना नव्हती आणि होत्याचे नव्हते झाल्याने लग्नातील आनंदी वातावरण दुःखात झाले.

