*भर पावसात ‘बापाचा’ बॅनर सावरणारे ते हात; सोशल मीडियावर फक्त एकाच व्हिडिओची चर्चा!
सुनिल गेडाम: विशेष प्रतिनिधी
सध्या च्या काळात सोशल मीडियावर व्हायरल होत त्या एका व्हिडिओ ची चर्चा आहे ,
येत्या काही दिवसांत अवघ्या जगाला मानवी हक्कांची दीक्षा देणारे विश्वरत्न, कायदेपंडित, बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी होत आहे. या महाउत्सवासाठी संपुर्ण देश सज्ज झाला असतानाच, सोशल मीडियावर एका व्हिडिओनेअंगावर शहारे आणले आहेत.
एप्रिल महिन्याचा कडाक्याचा उन्हाळा असताना अचानक निसर्गाने कुस बदलली आणि अवकाळी पावसाने थैमान घातले. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसात जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, याच वादळात एक हृदयस्पर्शी दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावलेला एक मोठा बॅनर वाऱ्यामुळे फाटण्याची किंवा खाली पडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
तो बॅनर खाली पडु नये म्हणून काही तरुणांनी भर पावसात, अंगावर कोसळणाऱ्या थेंबांची आणि निसर्गाच्या तांडवाची पर्वा न करता तो घट्ट धरून ठेवला, आमच्या अंगात असलेल्या शेवटच्या श्वास पर्यंत आम्ही आमची जबाबदारी पार पाडु.
”तू आमचा जीव घेऊ शकतोस, पण आम्ही आमच्या बापाचं नाव खाली जाऊ देऊ शकत नाही!” हीच भावना त्या तरुणांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. निसर्गाच्या आव्हानाला आपल्या भक्तीने उत्तर देणाऱ्या या तरुणांनी एकच संदेश दिला की, ज्या महामानवाने आम्हाला ताठ कण्याने जगायला शिकवले, त्यांचा सन्मान राखण्यासाठी आम्ही कोणत्याही संकटाला भिडायला तयार आहोत,
अशी ही तरुणही आपल्या बापाच्या बॅनर साठी निसर्गाची आव्हान देत होती , त्यांच्या या निष्ठे पुढे निसर्ग देखील हरला.
महाराष्ट्रात आज अशी अनेक गावे आहेत जिथे बौद्ध समाजाचे एकही घर नाही, तरीही तिथे बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि ते किती महान आहेत
हा व्हिडिओ अशाच एका व्यापक विचारांचे प्रतीक मानला जात आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नसुन ते संपुर्ण विश्वाचे आहेत”, हे या व्हायरल व्हिडिओने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
सध्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. प्रत्येक भारतीय या मुलांच्या धैर्याचे आणि निष्ठेचे कौतुक करत आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया: “हे रक्तातील प्रेम आहे, जे विकत घेता येत नाही.”
सलाम त्या जिद्दीला: “पाऊस तर दरवर्षी येतो, पण स्वाभिमानाचा हा उत्सव काळजात कोरलेला असतो.”

