राजेश वरटकर
मुख्य संपादक
वर्धा : विदर्भातील वर्धा जिल्हा घामाघुम झाला असुन तापमानाने 45 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. देशभरात उष्णतेच्या यादीत वर्धाचा दुसरा क्रमांक लागल्याने परिस्थिती भिषण बनली आहे. दुपारी रस्ते ओस पडले असुन, जणु काही ‘लॉकडाऊन’चं चित्र निर्माण झालं आहे.
पण प्रश्न असा की –
*ही केवळ नैसर्गिक आपत्ती आहे की प्रशासनाची उदासीनता*?
नागरिकांना ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय, ना सावलीची व्यवस्था! गावोगावी टँकरची प्रतीक्षा, तर शहरात वीजपुरवठ्याचा लपंडाव… उष्णतेने हैराण झालेल्या जनतेला दिलासा देण्याऐवजी प्रशासन मात्र थंडगार कार्यालयात बसुन ‘कागदी उपाय’ करत असल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, डॉक्टरांकडुन उष्माघाताचा धोका वाढल्याचा इशारा देण्यात आला असुन लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वर्धेकरांचा संताप उसळतोय —
“पारा 45 पार, पण प्रशासन शुन्यावर!”
जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर ही उष्णतेची लाट केवळ आकड्यांपुरती मर्यादित राहणार नाही… तर जनतेच्या जीवावर बेतु शकते!

