शिवशाही न्युज नेटवर्क
वर्धा : गर्जना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. महेश भाऊ ठाकुर यांनी शिवशाही न्युज लाइव्ह नेटवर्कच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देत मुख्य संपादक राजेश वरटकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी महेश भाऊ ठाकुर यांनी शिवशाही न्युज लाइव्हच्या निर्भीड व निष्पक्ष पत्रकारितेचे कौतुक करत समाजातील प्रश्नांना न्याय मिळवुन देण्यासाठी अशा माध्यमांची गरज असल्याचे सांगितले.
मुख्य संपादक राजेश वरटकर यांनी यावेळी सांगितले की शिवशाही न्युज लाइव्ह हे नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे व्यासपीठ राहील. सत्याची निर्भीड बाजु मांडण्याचा नेहमी प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीत सकारात्मक संवाद घडून आला असुन समाजहिताच्या विषयांवर एकत्रितपणे काम करण्याची भावना व्यक्त करण्यात आली.

