पोलिस पाटलाचा सत्तेचा माज बेभान , दहेगाव संतापाने पेटला!
शिवशाही न्युज नेटवर्क
सिंदी रेल्वे परिसरातील दहेगाव गोसावी येथे लोकसेवेच्या नावावर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकेलाच उघडपणे धमकावल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. गावातील प्रश्नावर मत मांडण्याचे धाडस केले आणि त्याची किंमत महिलेला धमकीच्या रूपात चुकवावी लागली.
“मी गावात राहत नाही, असे लोकांना कसं सांगतेस?” असा सवाल करत पोलिस पाटलाने आशा सेविकेच्या घरी जाऊन थेट दडपशाहीची भाषा वापरल्याचा आरोप आहे. वाद वाढताच संतापाच्या भरात कुटुंबासह आत टाकण्याची उघड धमकी देण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली यामुळे गावात भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
लोकसेविकेलाच गप्प बसवण्याचा प्रयत्न?
पोलिस पाटीलच कायद्याच्या वर?
या घटनेमुळे दहेगावात संतापाचा स्फोट झाला असुन महिलांमध्ये प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली आहे. लोकांसाठी काम करणाऱ्या आशा सेविकेलाच जर अशी वागणुक मिळत असेल, तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे न्याय मागायचा?
दरम्यान पिडित महिलेने पोलिसांत धाडसी तक्रार दाखल केली असुन संबंधित पोलिस पाटलाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र नागरिकांचा एकच सवाल- “कारवाई होणार की प्रकरण दाबलं जाणार?”
दहेगाव आता उत्तराची वाट पाहतोय… आणि संतापाचा ज्वालामुखी कधीही फुटु शकतो.

