सेलु/ शहर प्रतिनिधी
सेलु शहरातील शांतता चिरडणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तिन दिवस मृत्युशी झुंज देणाऱ्या अतुल गजाननराव देवळे (वय ४५) यांनी अखेर प्राण सोडले आणि संपुर्ण सेलु परिसर शोकसागरात बुडाला.
मिळालेल्या माहितीनुसार तिन दिवसांपुर्वी दुचाकीवरून जात असताना अतुल देवळे यांचा भीषण अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की ते गंभीर जखमी झाले, उपस्थितांनी त्यांना नागपुर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र नियतीपुढे वैद्यकीय प्रयत्नही निष्फळ ठरले.
तिन दिवस मृत्युशी झुंज देत अखेर बुधवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने सेलु शहरात हळहळ व्यक्त होत असून प्रत्येकाच्या ओठांवर एकच प्रश्न “असं अचानक का घडलं?”
गुरुवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील व भाऊ असा मोठा परिवार आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे देवळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन सेलु परिसरात शोककळा पसरली आहे.
मनमिळाऊ स्वभावाचे असलेले अतुल यांच्या अंत्ययात्रेला मित्र परिवार तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लाऊन परिवाराचे सांत्वन करीत दुःख व्यक्त केले.

