🔥 सेलू येथील घटना; सहा जणांकडून बेदम मारहाण
*सेलू (प्रतिनिधी):* भ्रष्टाचाराची बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून ‘शिवशाही न्यूज पोर्टल’चे मुख्य संपादक तथा पत्रकार राजेश पांडुरंगजी वरटकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना सेलु येथील मेडिकल चौकात घडली आहे. या हल्ल्यापूर्वी एकदिवस आधी वरटकर यांना माजी सरपंच ज्योती घंगारे व माजी उपसरपंच रामेश्वर घंगारे यांनी फोनवरुन अश्लील भाषेत शिव्या देत दिसेल तिथे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी राजेश वरटकर यांनी सेलु पोलिस स्टेशन तसेच वर्धा उप विभागीय अधिकारी तथा उप- अधिक्षक यांना लेखी तक्रार दिली असुन रामेश्वर घंगारे व माजी सरपंच ज्योती घंगारे यांच्या कडुन जिवाला धोका असुन, पोलिस संरक्षण ची मागणी केली होती मात्र पोलिस विभागाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याने गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या माजी उपसरपंच रामेश्वर घंगारे व चिंतामण महाकाळकर यांनी गावातील टपोरी जितेंद्र टेकाडे,अमर देवतारे दर्शन रामेश्वर घंगारे व सेलु येथील ठेकेदार गिरीधर बार ई यांना सोबत घेऊन राजेश वरटकर यांच्या मागावर राहुन जिवे मारण्याच्या उद्देशाने हमला करण्यासाठी सेलु येथील मेडिकल चौकात सापळा रचला.राजेश वरटकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी वर्धा येथे जाण्यासाठी दुचाकीवरून निघुन मेडिकल चौकात गेले असता गिरीधर बार ई याने रेकी करीत ईतर आरोपींना फोनवर माहिती दिली.आधीच राजेश वरटकर यांना जिवानिशी मारणेसाठी माजी सरपंच ज्योती घंगारे यांच्या घरी कटाची आखणी करणारे ईतर पांच आरोपी तात्काळ मेडिकल चौकात पोहचले व पत्रकार राजेश वरटकर यांना एकांतात गाठुन रामेश्वर घंगारे यांनी कालर पकडुन माझ्या विरोधात बातमी का छापतो असे म्हणत मारायला सुरुवात केली तसेच ईतर आरोपींना मारा साल्याला म्हणताच मस्तवाल माजी उपसरपंच चिंतामण महाकाळकर व ईतर आरोपींना चिथावणी दिली तेव्हा अमर देवतारे, दर्शन रामेश्वर घंगारे, जितु टेकाडे, गिरीधर बार ई यांनी लाथ मारुन रोडवर पाडले व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली, यावेळी मेडिकल चौकात सुमारे शंभर लोकांनी उघड्या डोळ्यांनी तमाशा बघीतला मात्र कोणीही मदतीला धावून आले नाही किंवा हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस स्टेशन ला माहिती दिली नाही.गंभीर जखमी अवस्थेत राजेश वरटकर यांनी पोलिस स्टेशन सेलु येथे रितसर तक्रार दाखल केली असता त्यांना सेलु येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी साठी पाठवण्यात आले, डॉक्टर नी दिलेल्या अहवालानुसार वरटकर यांच्या डोक्याला, डोळ्याला मार लागला असुन पत्रकार वरटकर यांनी तशी तक्रारही दाखल केली.सेलु पोलीसांनी दिलेल्या तक्रारीवरून ६ आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.्््््््््््््््जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश वरटकर यांनी त्यांच्या ‘शिवशाही न्युज पोर्टल’वर घोराड येथील श्री संत केजाजी महाराज संस्थानमध्ये सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या बातमीमुळे संबंधित व्यक्तींचे धाबे दणाणले होते. शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वरटकर हे मेडिकल चौक परिसरात आले असता, आरोपींनी त्यांना भररस्त्यात अडवले. “तू आमच्या विरोधात बातम्या का लावतोस?” अशी विचारणा करत आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले आणि आरोपींनी वरटकर यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात वरटकर यांच्या डोक्याला, डोळ्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
राजेश वरटकर यांनी पोलिसांत दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना फोनवरून सतत धमक्या येत होत्या. रामेश्वर घंगारे आणि त्यांच्या पत्नी माजी सरपंच सौ. ज्योती घंगारे यांनी फोनवरून त्यांची पत्रकारिता संपवण्याची भाषा केली होती. “तुला जिवंत मारणार” अशी उघड धमकी रामेश्वर घंगारे यांनी दिली होती, ज्याचे कॉल रेकॉर्डिंग वरटकर यांनी पोलिसांना पुरावा म्हणुन सादर केले आहे. विशेष म्हणजे, बातमीमध्ये माजी सरपंच ज्योती घंगारे यांचा कुठेही थेट उल्लेख नसतानाही त्यांनी ही धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद आहे. सेलू पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमान्वये , मुख्य आरोपी माजी उपसरपंच रामेश्वर घंगारे, चिंतामण महाकाळकर, जितेंद्र टेकाडे दर्शन घंगारे, अमर देवतारे आणि गिरीधर बारई यांच्यावर कलम १८९(२), १९०, १९१(२), ११५(२), ३५१(२) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरदिवसा एका संपादकावर झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील पत्रकार वर्तुळात तिव्र संतापाची लाट उसळली आहे. “लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आहे,” अशी भावना व्यक्त होत असून पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींना कडक शासन करण्याची मागणी होत आहे.

