आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी
सेलू : – घोराड येथील पत्रकार तथा शिवशाही न्युज लाइव्ह नेटवर्क चे मुख्य संपादक राजेश वरटकर यांच्यावर झालेल्या जिवघेण्या हल्ल्याचा सेलु तालुक्यातील पत्रकार संघाने निषेध नोंदवला आहे. या प्रकरणी सेलु पोलीस ठाण्याचे ठाणेदार देवेंद्र ठाकुर यांनी आरोपींना पाठीशी घातल्याचा गंभीर आरोप केला जात असुन या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हेगारावर तात्काळ ,पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करावी व राजकीय वलय असणारे गावगुंड माजी उपसरपंच रामेश्वर घंगारे, चिंतामण महाकाळकर, जितु टेकाडे,अमर देवतारे, गिरीधर बार ई,दर्शन घंगारे यांना तात्काळ अटक पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई करुन कडक शिक्षेची अंमलबजावणी करुन न्याय मिळवुन देण्यात यावा अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने ठाणेदार तथा वरिष्ठांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या घटनेमुळे तालुक्यातील पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश वरटकर यांनी घोराड येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान संदर्भात बातम्या प्रसिद्ध केल्याने या बातमीचा राग मनात धरून माजी उपसरपंच रामेश्वर घंगारे व माजी सरपंच ज्योती घंगारे यांनी ९ एप्रिल रोजी त्यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत वरटकर यांनी पोलिसात तक्रार दाखल करून ठाणेदारांकडे संरक्षणाची मागणी केली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही
दरम्यान, १० एप्रिल रोजी सकाळी ठाणेदारांच्या निवासस्थानासमोरच रस्त्यावर वरटकर यांच्यावर काहिनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, या घटनेची तक्रार दाखल केल्यानंतर सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला .
या घटनेच्या निषेध नोंदवत सेलु तालुक्यातील पत्रकारांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत निवेदन दिले आहे. यात आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ कारवाई करण्याबरोबरच संबंधित ठाणेदारावरही चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस , विरोधी पक्षनेते तसेच पोलीस महासंचालक यांना पाठविण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

