मुंबई : भारतीय संगीतसृष्टीतील दिग्गज आणि बहुमुखी गायिका आशा भोसले यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली असुन, त्यांच्या जाण्याने संपुर्ण देशभर शोककळा पसरली आहे. ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली (महाराष्ट्र) येथे जन्मलेल्या आशा भोसले यांनी आपल्या अद्वितीय आवाजाच्या बळावर भारतीय चित्रपटसृष्टीत अजरामर स्थान निर्माण केले. सात दशकांहुन अधिक काळ चाललेल्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी हिंदी, मराठीसह अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
आशा भोसले यांची ओळख केवळ एक गायिका म्हणुन नसुन, विविध शैलींमध्ये सहजतेने गाणारी “versatile singer” अशी होती. “पिया तू अब तो आजा”, “दम मारो दम”, “चुरा लिया है तुमने” यांसारख्या गाण्यांनी त्यांनी तरुणाईपासुन ज्येष्ठांपर्यंत सर्वांना भुरळ घातली.
शास्त्रीय संगित, गझल, पॉप, कॅबरे, भक्तिगिते अशा अनेक प्रकारांत त्यांनी आपली वेगळी छाप सोडली. त्यांच्या या अमुल्य योगदानासाठी त्यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभुषण ‘यांसारख्या सर्वोच्च सन्मानांनी गौरविण्यात आले होते.
आशा भोसले यांच्या निधनामुळे भारतीय संगीतविश्वातील एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या आवाजातील जादु, भावनांची खोली आणि गाण्यांमधील विविधता यामुळे त्या कायमच रसिकांच्या हृदयात जिवंत राहतील. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या सुरेल गाण्यांच्या रूपाने त्या सदैव स्मरणात राहतील, हेच त्यांच्या समृद्ध आणि यशस्वी जीवनकार्याचे खरे प्रतीक आहे.

