तालुका प्रतिनिधी
सेलू ः नागपुर कडुन वर्धेकडे जाणार्या कारला रानडुक्कर आडवा आल्याने चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळुन पलटी झाली यात कार मधील चार जण जखमी झाले ही घटना केळझर नजिकच्या नर्सरीजवळ रविवारी ता 12 ला मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली
रविवारी मध्यरात्रीला नागपुरकडुन वर्धेकडे येणारी कार क्रंमाक एमएच ३२ वाय ४२४२ हिला केळझर येथील सामाजिक रोप वाटिकेजवळ डुक्कर आडवा आल्याने गाडीवरील चालकांचे नियंत्रण सुटले यात ही कार समोरील दुभाजकावर चढुन विरुध्द दिशेने गेली. यावेळी समोरुन नागपुरकडे जाणारा ट्रक क्रंमाक एमएच ४०,सी डि ५२६४ चे चालक समोरिल हेडलाईटला धडकली व कारने पलटी मारली.यात कारमध्ये चालक व तिन महिला होत्या. कारचालक ईलाहि खान रा.फुलफैल वर्धा , तमन्ना योगेश विश्वकर्मा वय २७ रा.समतानगर वर्धा कोमल धानोरकर वय २९ रा.वर्धा,अल्फिया प्रणय फुलझेले वय २१वरूड (वर्धा)हे जखमी झाले घटनास्थळी
परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमीना गाडीतुन बाहेर काढण्यास मदत केली.यावेळी काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेने उपचारासाठी सेवाग्राम रूग्णालयात दाखल केले पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा किरण वरभे, सचिन उपाध्ये यांनी केला.रुग्णमित्र प्रज्वल लटारेयांनी जखमीना यांनी जखमीना रुग्णालयात भरती केले.

