जिल्हाधिकारी यांनी काढले परिपत्रक
जिल्हा प्रतिनिधी/ वर्धा
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार वर्धा जिल्ह्यास दिनांक 15/04/2026 रोजी यल्लो अलर्ट देण्यात आलेला असुन वर्धा जिल्ह्यात उष्मालाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. मागील दोन दिवसापासुन वर्धा जिल्ह्यातील अनेक भागात उन्हाची तिव्रता वाढली असुन भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार दिनांक 16/04/2026 रोजी वर्धा जिल्ह्याचे तापमान 43-45°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सदर परिस्थिती विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकते. उष्णतेच्या लाटेमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये या करिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा मधील विद्यार्थ्यांना दिनांक 16/04/2026 रोजी सुट्टी असणे आवश्यक आहे.
ज्याअर्थी, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत व संदर्भ क्र. २ अन्वये शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत.
वान्मथी सी., जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वर्धा यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम 30 व संदर्भ क्र. २ शासन परिपत्रक नुसार प्राप्त अधिकारान्वये वर्धा जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन संपुर्ण वर्धा जिल्हा सीमा क्षेत्रामध्ये दिनांक 16/04/2026, गुरुवार रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
याबाबत चे परिपत्रक
वान्मथी सी. (भा.प्र.से) जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वर्धा यांनी काढुन संबंधितांना कळविले आहे.

