वर्धा | प्रतिनिधी
महाराष्ट्रात कॅन्सर रुग्णांची झपाट्याने वाढ होत असताना उपचाराच्या प्रचंड खर्चामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः हतबल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वर्ध्यातून मुख्यमंत्री यांच्याकडे धडक निवेदन पाठवण्यात आले असून, “कॅन्सरवरील सर्व उपचार पूर्णतः मोफत करा,” अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
सध्या शासनाच्या योजनांअंतर्गत केवळ ₹5 लाखांपर्यंत मदत मिळत असली तरी प्रत्यक्षात कॅन्सरवरील उपचाराचा खर्च यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे अनेक रुग्ण उपचाराअभावी जीव गमावत असल्याची संतापजनक स्थिती निर्माण झाली आहे.
खासगी रुग्णालयांवर गंभीर आरोप
निवेदनात खासगी रुग्णालयांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शासन योजना लागू करण्यापूर्वीच विविध तपासण्यांच्या नावाखाली रुग्णांकडून हजारो-लाखो रुपये उकळले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “ही थेट रुग्णांची लूट आहे,” असा संतप्त सूर उमटला आहे.
“₹5 लाखांची मर्यादा म्हणजे थट्टा!”
कॅन्सर उपचारासाठी लागणारा एकूण खर्च लक्षात घेता ₹5 लाखांची मर्यादा ही अपुरी आणि केवळ दिखाऊ असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचे उपचार अर्धवट राहतात आणि त्यांचे आयुष्य धोक्यात येते.युवा परिवर्तन की आवाज संघटना वर्धा तर्फे
निवेदनाद्वारे सरकारसमोर काही ठोस मागण्या ठेवण्यात आल्या आहेत: यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निसार पांडे,
सर्व कॅन्सर उपचार पुर्णपणे मोफत करावेत
केमोथेरपी, रेडिएशन, शस्त्रक्रिया व सर्व तपासण्या विनामुल्य कराव्यात
₹5 लाखांच्या पुढील खर्चासाठी स्वतंत्र निधी तयार करावा
खासगी रुग्णालयांच्या मनमानीवर कठोर कारवाई करावी
प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर उपचार केंद्र सुरू करावे
“जिव वाचवा, नाहीतर संताप उफाळेल!”
“कॅन्सर हा केवळ आजार नाही, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणारे संकट आहे. सरकारने तात्काळ निर्णय घेतला नाही तर जनतेचा संताप उफाळल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे.यावेळी युवा परिवर्तन की आवाज संघटना वर्धा संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, विशाल इचपाडे,अमित भोसले, शेखर इंगोले, अश्विनी भेंडे, इर्शाद शहा, प्रशांत पाटील,शुभम निमजे, दिनेश परचाके, दिनेश देवतळे,मनोज कडमकर इत्यादी उपस्थित होते.
*सरकार आता काय निर्णय घेणार? कॅन्सरग्रस्तांना दिलासा मिळणार की फक्त आश्वासनांचाच पाऊस पडणार आहे?
या प्रश्नाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

